

सातारा : चक्क मे महिन्यातच खटाव तालुक्यातील सर्वात मोठा येरळवाडी मध्यम प्रकल्प सोमवारी सकाळी पूर्ण क्षमतेने भरुन वाहू लागला. धरणात १.१५ टीएमसी पाणीसाठा होवून सांडव्यावरुन येरळा नदीपात्रात विसर्ग सुरु झाल्याने बळीराजा आनंदला आहे. धरणावर अवलंबून असणाऱ्या आठ गावच्या प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना आता सुरळीत होवून वडूजसह बहुतांश गावांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.इतिहासात पहिल्यांदाच येरळवाडी धरण मे महिन्यात भरल्याने सांडव्यावरील विसर्ग पहायला गर्दी होत आहे.
फलटण तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे, अशा मध्येच फलटण तालुक्यातील तरडगाव येथील पालखी मार्गावर खड्डेच खड्डे पडले आहेत, त्यामुळे वाहनधारकांना मोठा वाहन चालवताना त्रास सहन करावा लागत आहे, पालखी सोहळ्याला महिना शिल्लक असताना पालखी महामार्ग अवघ्या दोन महिन्यात खराब झाला आहे. वारकरी संप्रदाय आणि नागरिकांनी कामाच्या दर्जाबाबत नाराजी व्यक्त केली आहे, लवकरात लवकर प्रशासनाने खड्डे मोजून पालखी मार्ग व्यवस्थित करावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्यामध्ये काल दिवसभरात अतिवृष्टी झाली होती.आणि त्यामुळेच या भागातील काही गावांचा संपर्क देखील तुटला होता. काही गावांमध्ये पाणी शिरलं होतं. त्यामुळे प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा नागरिकांना दिला होता. त्याच पद्धतीने प्रशासनाने NDRF च्या टीमला सुद्धा यावेळी फलटणमध्ये बोलवण्यात आलं आहे. रात्री उशिरा NDRF ची टीम फलटण मध्ये पोहोचली. आणि इथल्या परिस्थिती ची प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली.
सातारा जिल्ह्यात अक्षरशा पावसाने धुमाकूळ घातला आहे प्रामुख्याने बघायला गेलं तर फलटण, माण, खटाव,महाबळेश्वर, सातारा या भागात मुसळधार पाऊस पडत आहे, या पावसामुळे मोठ्या प्रमाणात घरांसह शेतीच नुकसान झालेलं आहे, काही ठिकाणी विद्युत सेवा देखील खंडित झालेली आहे, फलटण मध्ये एनडीआरएफ ची टीम देखील दाखल झालेली आहे, मान मधील बाणगंगा नदीला पूर आल्याने 16 गावांचा संपर्क देखील तुटला आहे, काही नदीकाठच्या कुटुंबांना स्थलांतरित देखील करण्यात आलेले आहे