सातारा : खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे यांना राजघराण्यातील सदस्यांचे आव्हान?

सातारा : खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे यांना राजघराण्यातील सदस्यांचे आव्हान?
Published on
Updated on

सातारा, पुढारी वृत्तसेवा 

साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. राजघराण्यातील सदस्य वृषालीराजे यांनी आज शिवजयंतीच्या मुहूर्तावर सातारा पालिका निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना राजघराण्यातील सदस्यांचे मोठे आव्हान असल्याचे साताऱ्यात बोलले जात आहे?

सातारा पालिकेच्या वतीने राजवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती सोहळ्यास छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशज वृषालीराजे भोसले यांनी उपस्थिती लावली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या कोरोनामुळे दोन वर्ष शिवजयंती साजरी करण्यात आली नव्हती. आज मोठ्या उत्सहात शिवजयंती साजरी होत आहे.

ज्याप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे लक्ष्य होतं त्या प्रकारे सातारकरांना माझी कशी मदत होईल हे माझे पुढील लक्ष्य असणार आहे. साताऱ्यात नागरिकांना रस्त्याच्या आणि पाण्याच्या समस्या भेडसावत आहेत. सातारकरांच्या अडचणी आणि समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे सांगत येणाऱ्या पालिका निवडणुका लढवण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

हे ही वाचलं का  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news