

सातारा ; पुढारी वृत्तसेवा सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असणाऱ्या ढेबेवाडी विभागातील वांग – मराठवाडी धरण 73 टक्के भरले आहे. 2.73 टीएमसी पाणी साठवण क्षमतेच्या या धरणात 56.576 दशलक्ष घनमीटर इतका पाणी साठा झाला आहे. धरणाच्या सांडव्यातून प्रतिसेकंद 361 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
जून महिन्यापासून आजवर अत्यल्प पाऊस झाल्याने हे धरण 73 टक्के भरण्यासाठी ऑगस्ट महिना उजाडला आहे. तसेच या धरणाची काही कामे अजूनही प्रलंबित असल्याने यंदा धरणात यापेक्षा जादा पाणी साठा केला जाणार नाही, अशी माहिती प्रकल्प अभियंता निखिल खांडेकर यांनी दिली आहे. मागील वर्षी धरणाची प्रलंबित कामे असल्याचे कारण देत मागणी नसतानाही ऑक्टोबरमध्ये धरणातील बहुतांश पाणी सोडून देण्यात आले होते. तर उर्वरित पाणी राखीव ठेवण्यात आल्याने ऐन उन्हाळ्यात त्यामुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागून लाभक्षेत्रातील शेतकर्यांच्या पिकांना पाणी मिळू शकले नव्हते. त्यामुळे यंदा मागणी नसताना पाण्याचा विसर्ग केला जाऊ नये अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
हेही वाचा :