छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण विद्यार्थी जनआंदोलन समितीकडून भव्य मोर्चा

मराठा आरक्षण
मराठा आरक्षण
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण मिळावे, यासाठी आज (बुधवार) क्रांती चौकातून मराठा आरक्षण विद्यार्थी जनआंदोलन समितीच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

जय भवानी जय शिवाजी, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, एकच मिशन मराठ्यांना आरक्षण अशा घोषणा देत शेकडो विद्यार्थी हाती मागण्यांचे फलक आणि भगवे झेंडे घेवून जमले आहेत. हा मोर्चा क्रांतीचौक, सिल्लेखाना, निराला बाजार, औरंगपुरा मार्गे विभागीय आयुक्त कार्यालय येथे विभागीय आयुक्तालयावर धडकणार आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news