Phaltan Electric Shock Incident: बल्ब बदलताना वडिलांना लागला विजेचा शॉक; वाचवण्याच्या प्रयत्नात पत्नी, दोन मुलांचा जागेवर कोळसा

Phaltan Electric Shock Incident
Phaltan Electric Shock Incidentpudhari
Published on
Updated on

Phaltan Electric Shock Incident: सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात खामगावमध्ये एक धक्कादायक आणि ह्रदयद्रावक घटना घडली आहे. विजेच्या शॉकने पारधी समाजातील एकाच कुटुंबातील चौघांचा जागीत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे चौघेजणं एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

Phaltan Electric Shock Incident
Electrocution Death Latur | झाडावर पाला तोडताना शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

मृतांमध्ये सतीश उर्फ पिसुरड्या किसन शिंदे (वय ४५), गंगू सतीश शिंदे (वय ४०), सचिन सतीश शिंदे (वय २६), आरती सतीश शिंदे (वय २४) यांचा समावेश आहे. हे सर्वजण खामगावमधील साखरवाडी भागात रहात होते.

Phaltan Electric Shock Incident
Sangli Electric Shock Death: सिंगनहळ्ळी येथे विजेच्या धक्क्याने वृद्धेचा मृत्यू

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आज (दि. ८ जुलै) सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सतीश यांना बल्ब काढताना विजेचा झटका लागला. त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात पत्नी आणि २ मुले यांना देखील विजेचा झटका लागला अन् त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Phaltan Electric Shock Incident
electrocution death Nanded : काळाचा क्रूर घाला : वीज तारेचा स्पर्श होऊन शेतमजूर, बैल जागीच ठार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news