

साताराः आज भारतीय जनता पार्टीच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी आमदार डॉक्टर अतुल भोसले यांची निवड झाल्यानंतर प्रथमच स्वागत करण्यात आले. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी व्यक्ती म्हणून स्वागत झालं नाही तर भारतीय जनता पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून स्वागत झाले. उद्या पक्षाने बॉन्ड्रीवर जाऊन उभे राहयला सांगितले तरी मी तयार आहे.
हे सारे श्रेय पक्षाच आहे. स्वागत मोठं झालं असलं तरी पक्ष मोठा व मजबूत झाला आहे. प्रश्न खरा आहे की मी काही जिल्हाध्यक्ष होण्यासाठी इच्छुक नव्हतो. पण मला आता आमदार म्हणून जनतेने संधी दिली आहे. अशी भावना व्यक्त केली.
भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून श्रीमंत छत्रपती मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले तसेच मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली, आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं ठरवलं आहे. शेवटी आता भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षाने उद्या सांगितले की बॉण्ड्री वर जाऊन उभे राहायचे आपल्याला तर बॉण्ड्री वर जाऊन उभे राहू.
त्या पद्धतीने पक्षाकडून आदेश आला आपल्याला जिल्हाध्यक्ष व्हायचं आहे. पक्षाने आदेश केलेला आहे त्या पद्धतीने मला आत्ता संधी मिळाली. पुढील काळात पक्षवाढीच्या अनुषंगाने सर्वतोपरी प्रयत्न करू आणि महायुती कशी अधिक बळकट होईल याचा देखील विचार करू असं देखील आमदार डॉ अतुल भोसले यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली.