

BJP Satara President Atulbaba Bhosale
कराड : भाजप सातारा जिल्हाध्यक्षपदी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडीनंतर सातारा जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जात आहे.
मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आमदार अतुलबाबा भोसले यांनी दारुण पराभव केला होता. स्वातंत्र्यापासून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे केवळ तीन जणांनी विधानसभेत प्रतिनिधित्व केले होते आणि विशेष म्हणजे हे तिन्ही लोकप्रतिनिधी काँग्रेसचेच होते. मात्र, आमदार अतुलबाबा भोसले यांनी स्वातंत्र्यानंतरच्या सात दशकातील काँग्रेसच्या वर्चस्वाला सुरुंग लावत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा धक्कादायक पराभव केला.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघासोबतच सातारा जिल्ह्यातील पक्ष वाढीसाठी आमदार अतुलबाबा हे महत्वपूर्ण योगदान देतील, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना असून त्यांच्या निवडीमुळे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघासह सातारा जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जात आहे.