कराड ; ओगलेवाडी येथे पुसेसावळीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाकाबंदी

पुसेसावळी रस्त्यावर नाकाबंदी
पुसेसावळी रस्त्यावर नाकाबंदी

कराड; पुढारी वृत्तसेवा पुसेसावळी येथे आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाल्यानंतर दोन गटात तुफान राडा झाला. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील संपूर्ण इंटरनेट सेवा बंद केली आहे. तसेच जागोजागी नाकाबंदी करून पुसेसावळीकडे जाणारी वाहने रोखली आहेत.

कराड जवळील ओगलेवाडी येथे करवडी फाट्यावर पोलिसांनी रस्त्यावर बॅरिगेट्स लावून नाकाबंदी केली आहे. पोलीस बंदोबस्त वाढवला असून, कराडहून पुसेसावळीकडे जाणारी वाहने रोखली आहेत. कोणतीही वाहन पुसेसावळीकडे सोडली जात नाहीत. सर्व वाहनांची पोलीस तपासणी करत असून, नाकाबंदीच्या ठिकाणीच वाहने परत पाठवली जात आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news