पुढारी ऑनलाईन डेस्क : "सरकार मराठा समाजासोबत आहे, मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थोडा वेळ द्यावा. सर्वोच्च न्यायालयात मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिक मागास आहे, हे सिद्ध करण्याचं काम करणार आहे. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. विरोधकांनीही सहकार्याची भूमिका घ्यावी," असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. आज (दि.११) भीमाशंकर येथे माध्यमांशी ते बोलत होते.
ओबीसी समाजाला मिळणारे लाभ मराठा समाजाला दिले जात आहेत. इतर समाजाचं आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आधी आरक्षण दिलं होत, तीच भूमिका आजही सरकारची आहे. सर्वांच्या सहकार्यांने टिकेल असं आरक्षण देण्याबाबत चर्चा करण्यासाठी आज बैठक बोलावली आहे, विरोधकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे.
हेही वाचा :