वाघनखं पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी झुंबड

शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शन खुले : शस्त्रास्त्र व पत्रांचेही बारकाईने निरीक्षण
First Day Rush To See Waghnakh
शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शन पाहण्यासाठी शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालयात पहिल्याच दिवशी (शनिवारी) गर्दी केली.Pudhari File Photo
Published on
Updated on

सातार्‍यातील छत्रपती शिवाजी संग्रहालयात ‘शिवशस्त्र शौर्यगाथा’ या शिवकालीन वस्तूंचे प्रदर्शन शनिवारी जिल्हावासीयांसाठी खुले करण्यात आले. या प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अफझल खानाचा कोथळा काढला, ती वाघनखं सर्वांचे आकर्षण ठरली. ही वाघनखं व शिवकालीन वस्तू पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी विद्यार्थी आणि नागरिकांची झुंबड उडाली.

First Day Rush To See Waghnakh
शिवरायांची वाघनखं स्वराज्याच्या राजधानीत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री व आमदारांच्या उपस्थितीत वाघनखांचे अनावरण आणि शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी करण्यात आले. यानंतर शनिवारपासून हे प्रदर्शन सातारकरांसाठी खुले करून देण्यात आले. शनिवार हा सुट्टीचा दिवस असल्याने सकाळपासूनच छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालयात शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांची अक्षरश: झुंबड उडाली होती. यावेळी विद्यार्थी व नागरिक शिवकालीन शस्त्रांचे बारकाईने निरीक्षण करत होते. तसेच या शस्त्रांची माहितीही टिपत असल्याचे चित्र दिसून आले. ज्या दालनात वाघनखं ठेवली आहेत, त्या परिसरात दिवसभर गर्दी होती.

First Day Rush To See Waghnakh
वाघनखं अनावरणाचा आज साताऱ्यात दिमाखदार सोहळा; मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती

छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालयात शिवकालीन वस्तूंची विविध दालने तयार करण्यात आली आहेत. या दालनांत शिवकालीन पालखी, शिवकालीन मेणा, शिवराईचा साठा, कुर्‍हाड, अंकुश, तोडेदार बंदूक, दांडपट्टा, रणशिंग, फरशा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाचा व हाताचा ठसा, कट्यार, खंडा तलवार, झिराह चिलखत, बरचा भाला, शिकरगाह तलवार, दोरीचा बरचा, बल्लम भाला, नेझा भाला, पट्टीसा तलवार, सोसनपत्ता तलवार, वक्रधोप तलवार, गुप्ती, नेझा भाला, हत्तीच्या सुळावरचे शस्त्र, विटा, सांग भाला, शिवकालीन नाणी, खंजीर, परशू, धनुष्यबाण, गुप्तीचे विविध प्रकार, जेडची मूठ, बिचवा, बंदुकांचे प्रकार, दारूच्या पुड्याचा शिंगाडा, संगिनी, पिस्तुले, अंगरखा, जरीबुट्टीचे कपडे, बख्तर, बाहू, आच्छादने, तुमान, विविध प्रकारच्या पगड्या, शेला यांसह विविध शिवकालीन वस्तू पाहण्यात सातारकर दंग झाले होते.

First Day Rush To See Waghnakh
शिवरायांच्या वाघनखांवरून राजकीय रणकंदन

शस्त्रास्त्रांसह मोगलांशी झालेल्या युद्धाप्रसंगी खजिन्यावर ताण पडू नये म्हणून वतनी मुलखातून रक्कम जमा करण्याबाबत छत्रपती शिवाजी महाराजांचे पत्र व पाटीलकी बहाल करणारे पत्रही विद्यार्थी न्याहळत होते. पहिल्याच दिवशी महाराजा सयाजीराव विद्यालयातील 200 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. दिवसभरात 1 हजार 414 पर्यटक, 107 लहान मुले, 228 कॉलेज युवकांनी प्रदर्शन पाहिले असल्याची माहिती अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news