शिवरायांची वाघनखं स्वराज्याच्या राजधानीत

याच वाघनखांनी काढला होता खानाचा कोथळा : दि. 20 पासून जनतेसाठी खुली
 tiger fight in Satara in Satara
ऐतिहासिक वाघनखं सातार्‍यातPudhari File Photo
Published on
Updated on

स्वराज्यावर चाल करून आलेल्या अफजलखानाचा कोथळा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हातांमधील बोटात घातलेल्या ज्या वाघनखांनी काढला होता, तीच वाघनखे स्वराज्याची चौथी राजधानी असलेल्या छत्रपतींच्या सातार्‍यात दिमाखात विराजमान झाली आहेत. ही ऐतिहासिक वाघनखं लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम येथून सातार्‍यात दाखल झाली आहेत. मुंबई विमानतळावरून विशेष वाहनाने ही वाघनखे सातार्‍यात आणण्यात आली. छत्रपती शिवाजी संग्रहालयाबाहेर त्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार्‍या प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर ही वाघनखे जनतेसाठी शनिवार, दि. 20 जुलैपासून खुली होणार आहेत.

अशी आहेत वाघनखे

  • घटक : पोलाद, चामडे व रेशीम

  • मोजमाप : लांबी 8.6 सेमी, खोली 9.5 सेमी, पट्टीची लांबी 7.5 सेमी, अंगठ्याचा व्यास 2.5 सेमी (मोठी), 2.3 सेमी (लहान)

  • नख्यातील अंतर (मोठी अंगठी ते लहान अंगठी) 1.8 सेमी, 1.8 सेमी, 1.5 सेमी

  • एकूण वजन 49 ग्रॅम

 tiger fight in Satara in Satara
टिपू सुलतानच्या तलवारीवर आक्षेप नाही मग वाघनखांवर का?

स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा कोथळा छ. शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर काढला होता. ही वाघनखे इंग्लंडमधील संग्रहालयात होती. ही वाघनखे भारतात आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील होते. अखेर या प्रयत्नांना यश आले असून, वाघनखे महाराष्ट्रात आणली आहेत. मराठा साम्राज्याची चौथी राजधानी असलेल्या सातार्‍यात ही वाघनखे प्रथम ठेवली जाणार आहेत. तब्बल सात महिने ही वाघनखे सातार्‍यात राहणार आहेत. त्यानंतर ही वाघनखे कोल्हापूर व नागपुरात नेण्यात येणार आहेत.

 tiger fight in Satara in Satara
शिवरायांची वाघनखे मेमध्ये सातार्‍यात येणार

लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम येथून बुधवारी सकाळी 10 वाजता ही वाघनखे मुंबई विमानतळावर आणण्यात आली. लंडनहून कस्टमचे अधिकारी आणि पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्‍यांनी ही वाघनखे मुंबईत आणली. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात सायंकाळी ही वाघनखे सातार्‍यासाठी आणण्यात आली. शिवाजी संग्रहालय प्रवेशद्वारात पोहोचल्यावर वाहनातील वाघनखं असलेली पेटी बाहेर काढली. ती पेटी वाघनखं ठेवण्यात येणार्‍या कक्षात नेण्यात आली. तेथे कस्टम अधिकारी, पुरातत्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पोलिस अधिकारी व संग्रहालय अभिरक्षक यांच्यासमोर या पेटीचे सील फोडण्यात आले. उपस्थितांना वाघनखं दाखवून ती पेटी पुन्हा बंद करण्यात आली. ज्या पेटीमध्ये वाघनखं प्रदर्शनाला ठेवले जाणार आहे त्याचे तापमान सेट केले जाणार आहे. त्यानंतर रात्री उशिरा ही वाघनखे नियोजित ठिकाणी ठेेवली जाणार आहेत. वाघनखे आल्यानंतर ते हताळण्यासाठीचे प्रात्यक्षिकही यावेळी करण्यात आले. वाघनखांच्या सुरक्षेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news