Drought Impact On Sugarcane | दुष्काळाच्या झळांमुळे ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत; गाळप लांबल्यास वजन घटण्याचा मोठा धोका

Drought Impact On Sugarcane | गाळप लांबल्यास वजन घटण्याचा धोका; कारखाने तातडीने सुरू करण्याची मागणी
Sugarcane
Sugarcane
Published on: 
Updated on: 

कराड : पुढारी वृत्तसेवा
पाण्याअभावी उसाची वाढ खुंटण्याची आणि वजन घटण्याची भीती, त्यातच गाळप हंगामाबाबतची अनिश्चितता, अशा दुहेरी संकटात ऊस उत्पादक शेतकरी सापडले आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे ऊसपिकाला फटका बसण्याची शक्यता असल्याने तोडणीस तयार असलेल्या उसाचे तातडीने गाळप करावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

Sugarcane
Beed Politics | ‘खासदार सोनवणे यांच्या मुलीचा पराभव केल्याने माझ्यावर राग’ : सुग्रीव कराड

कारखाने सुरू करण्यास विलंब झाल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. राज्य शासनाने ३०५ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले असून, पावसाभावी ग्रामीण भागात पाणीटंचाई तीव्र होत आहे.

सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे आणि सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक पट्ट्यातही पाण्याचे नियोजन करताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. उसाला नियमित पाणी न मिळाल्यास काड्यांची जाडी, वजन आणि एकूण उत्पादन घटण्याची शक्यता आहे. त्याचा साखरेचे प्रमाण आणि उताऱ्यावरही परिणाम होऊ शकतो.

दुष्काळी परिस्थितीचा विचार करून राज्यातील ५० हून अधिक साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. मात्र, काही ठिकाणी शेतकरी संघटनांनी गाळप बंद करण्याची भूमिका घेतल्याने उसगाळपात अडथळे निर्माण झाले आहेत. परिणामी, तोडणीस तयार असलेला ऊस शेतात राहण्याची शक्यता वाढली आहे.

पाणी टंचाईमुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी कारखान्यांनी गाळप तातडीने सुरू करावे, तसेच ऊसतोडणीचे नियोजन वेगाने करावे, अशी मागणी होत आहे. वेळेत गाळप झाल्यास उसाचे वजन टिकवण्यास आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान कमी करण्यास मदत होऊ शकते.

Sugarcane
Bhagwat Karad Medical Help | दिल्ली–आइजोल विमानात प्रवाशाचा श्वास कोंडला; डॉ. भागवत कराड यांची तत्परता

राज्यातील ५० हून अधिक कारखाने सुरू

  • सातारा जिल्हा : प्रतापगड, अजिंक्यतारा, जर्नेश्वर, बाळासाहेब देसाई, शिवनेरी, कृष्णा, जयवंत शुगर्स, अथणी शुगर्स, मान खटाव ग्रो.

  • पुणे जिल्हा : भिमा, दौंड साखर, सोमेश्वर, छत्रपती, नीरा-भीमा, पराग ग्रो, श्रीनाथ म्हस्कोबा, भीमाशंकर, माळेगाव, भीमा पाटस.

  • सांगली जिल्हा : क्रांती, सोनहिरा, हुतात्मा, श्रीपती शुगर, सद्गुरु श्री श्री रविशंकर, सर्वोदय, नागेशवाडी, विश्वास, उदगिरी शुगर.

  • सोलापूर जिल्हा : भीमा, इंडियन शुगर्स, एसएमएस मोहिते-पाटील, श्री शंकर, युटोपिियन शुगर, पांढरंग, पाटील ग्रो, सीताराम, विठ्ठल, विठ्ठलराव शिंदे युनिट १ व २.

  • अहमदनगर जिल्हा : भाऊसाहेब थोरात, श्री ज्ञानेश्वर, मुळा, प्रवरा, श्रीगोंदा, अंबालिका शुगर, गंगामाई.

  • धाराशिव जिल्हा : कांचेश्वर, नॅचरल शुगर.

  • बीड जिल्हा : लोकमते, गंगामाऊली.

  • लातूर जिल्हा : विलास सहकारी साखर कारखाना.

  • नाशिक जिल्हा : द्वारकाधीश, केजीएस शुगर्स.

  • नांदेड जिल्हा : भाऊराव चव्हाण, सुबाष शुगर.

  • छत्रपती संभाजीनगर जिल्हा : बारामती ॲग्रो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news