सातारा : लिव्ह इन रिलेशनशीप; युवकाला चोप

सातारा : लिव्ह इन रिलेशनशीप; युवकाला चोप
Published on
Updated on

सातारा : पुढारी वृत्तसेवा; चार वर्षांपासून महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये असलेल्या युवकाला पाच जणांनी बेदम चोप दिला. या घटनेत युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी संबंधित महिलेसह पाच युवकांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अदिल कुर्लेकर, संकेत डाळवाले, अरबाज खान, महंमद मुकंदर, सूरज रजपूत (सर्व रा. शनिवार पेठ, सातारा) यांच्यावर हाफ मर्डरचा गुन्हा दाखल झाला आहे. योगेश इंदलकर (रा. कळंबे, ता. सातारा) असे मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.

दरम्यान, यातील संशयित महिला सातार्‍यातील दौलतनगर येथे राहत असून सुरुवातीला तिनेच पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र तपासामध्ये मारहाण करण्यासाठी तिने सांगितल्याचे निष्पन्‍न झाल्याने महिलेला सहआरोपी करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना दि. 21 रोजी घडली आहे. जखमी योगेश व संबंधित महिला गेल्या 4 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वाद होण्यास सुरुवात झाली. दि. 21 रोजी वाद विकोपाला गेल्यानंतर महिलेने इतर संशयित आरोपींशी संगनमत करुन योगेशला मारहाण करण्यास सांगितले. संशयितांनी त्यानुसार योगेश याला बेदम मारहाण केली व जखमी अवस्थेत संबंधित महिलेकडे योगेश याला सोडले.

योगेश मारहाणीत जखमी झाल्याने संबंधित महिलेने तिच्या मैत्रिणीच्या घरी जखमी योगेश याला सोडले. दि. 21 रोजी रात्रभर तो विना उपचाराचा तेथेच होता. दुसर्‍या दिवशी सकाळपर्यंत योगेश बोलण्याच्या अवस्थेत नसल्याचे लक्षात येताच संबंधित महिलेने सातार्‍यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलिसांकडे एमएलसी आल्यानंतर मारहाण असल्याचे समोर आले. जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याने तपासाला सातारा तालुका पोलिसांनी सुरुवात केली.

महिलेने संशयित युवकांची नावे सांगितल्याने पोनि विश्‍वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकातील (डीबी) पोलिस हवालदार दादा परिहार, नितीराज थोरात, सतीश पवार यांनी बुधवारी संशयितांची धरपकड केली. तपासामध्ये मात्र या घटनेत महिलेचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्या महिलेला सहआरोपी केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news