शेतेच्या हद्दीत दुचाकी-टेम्पोची समोरासमोर धडक

अपघातात एक युवक जागीच ठार
A two-wheeler-tempo collided head-on in the farm boundary
शेते येथे अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. Pudhari Photo

पाचगणी : पुढारी वृत्तसेवा

कुडाळ- करहर रस्त्यावर शेते, ता. जावली गावच्या हद्दीत शनिवारी दुचाकी व टेम्पो या दोन वाहनांची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला आहे. तर पाठीमागे बसलेला युवक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची नोंद मेढा पोलिस ठाण्यात झाली आहे.

A two-wheeler-tempo collided head-on in the farm boundary
अमरावती : चिखलदरा येथे अपघात; एका युवकाचा मृत्यू

हर्षित सदाशिव शेट्टी (वय 32, रा. मुंबई) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तर साहिल मंगेश शिंदे (वय 23) हा जखमी झाला आहे. याप्रकरणी टेम्पो चालक सुरज रमेश भिलारे (रा. शेते, ता. जावली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

A two-wheeler-tempo collided head-on in the farm boundary
ट्रॅक्टर व मोटरसायकलच्या अपघातात पाच वर्षाचा मुलगा ठार

दुचाकी चालक हर्षित शेट्टी हा करहरच्या दिशेने जात होता तर टेम्पो चालक सूरज हा कुडाळकडे निघाला होता. दोन्ही वाहने शेते गावच्या हद्दीत आली असता दुचाकी व टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये हर्षित हा जागेवरच ठार झाला. तर त्याचा मित्र साहिल शिंदे हा गंभीर जखमी झाला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news