ट्रॅक्टर व मोटरसायकलच्या अपघातात पाच वर्षाचा मुलगा ठार

पाचोड ते विहामांडवा रोडवर चौढाळा जवळ ट्रॅक्टर व मोटरसायकलचा अपघात झाला
Chhatrapati Sambhajinagar: Five-year-old boy killed in an accident
पाच वर्षाचा मुलगा अपघातात ठार Pudhari Photo

पैठण : पुढारी वृत्तसेवा

पाचोड ते विहामांडवा रोडवर चौढाळा जवळ ट्रॅक्टर व मोटरसायकलचा अपघात झाला. यामध्ये पाच वर्षाचा मुलगा ठार झाला तर त्याचे वडील जखमी झाले. ही घटना आज (शुक्रवार) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान मृत मुलगा पारधी समाजाचा असल्यामुळे पारधी समाजाच्या महिलांनी पाचोड ग्रामीण रुग्णालयात गोंधळ केला.

Chhatrapati Sambhajinagar: Five-year-old boy killed in an accident
‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण', विभागात सहा जिल्ह्यात ३ लाख १ हजार अर्ज

पाचोड पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खंडाळा येथील नितीन रहमान चव्हाण (वय ३०) हे आपल्या मुलाला सोबत घेऊन शुक्रवारी सकाळी मोटर सायकलवर विहामांडवा येथे आले होते. दोघे मोटर सायकलवरून विहामांडवा येथून खंडाळा गावाकडे जात होते. यावेळी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास केकत जळगाव येथून एक ट्रॅक्टर विहामांडवाकडे येत असताना ट्रॅक्टर व मोटरसायकल मध्ये अपघात होऊन या अपघातात नितीन रहमान चव्हाण व आर्यक्य नितीन चव्हाण वय ६ हे दोघेजण जखमी झाले होते.

Chhatrapati Sambhajinagar: Five-year-old boy killed in an accident
विधान परिषद निकालानंतर अनिल देशमुखांची पोस्ट चर्चेत; म्हणाले,"विकले गेलेले..."

त्‍यांना उपचारासाठी पाचोड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी नुमान शेख यांनी तपासून डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे सहा वर्षीय आर्यक्य मरण पावल्याचे घोषित केले. या घटनेची माहिती पाचोड पोलीस स्टेशनला कळताच पाचोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे व त्यांचे पोलीस सहकारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून पाचोड ग्रामीण रुग्णालयात आले होते. मृत झालेला मुलगा पारधी समाजाचा असल्यामुळे पारधी समाजाच्या महिलांनी ग्रामीण रुग्णालयात येऊन एकच आक्रोश केला. वैद्यकीय अधिकारी डॉ शेख यांनी मृत मुलाचे शव विच्छेदन केले.

Chhatrapati Sambhajinagar: Five-year-old boy killed in an accident
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज सुटीच्या दिवशीही

पाचोड पोलीस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अपघाताची नोंद करण्यात आलेली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे हे करत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news