सातारा : वडगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बॅकेत ग्रामस्थांच्या जागरुकतेमुळे चोरीचा प्रयत्न फसला

बॅकेत चोरीचा प्रयत्न
बॅकेत चोरीचा प्रयत्न

पुसेसावळी: पुढारी वृत्तसेवा : खटाव तालुक्यातील जयरामस्वामींचे वडगाव येथे शनिवारच्या मध्यरात्रीच्या सुमारास सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅकेत चोरीचा प्रयत्न वडगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बॅकेत ग्रामस्थांच्या जागरुकतेमुळे चोरीचा प्रयत्न  फसला. चोरांना तिजोरी फोडता आली नसल्याने रोख रक्कम व ऐवज जैसे थे होते. यामुळे बॅक अधिकारी व ठेवीदारांचा जीव भांडयात पडला आहे.

वडगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत शनिवारी मध्यरात्री एक ते दीडच्‍या सुमारास चोरांनी प्रवेश करुन सीसीटीव्हीचे कॅमेरे बंद केले. याच दरम्यान बॅकेतील भोंग्याचा आवाज आल्यामुळे व संबधित अधिकार्‍यांनी मोबाइलद्वारे मेसेज गेल्यामुळे घटनेचे गांभीर्य समजले.  माहिती मिळाल्यावर गावातील ग्रामस्थ बॅकेजवळ आले. त्यामुळे चोरटे तिजोरी न फोडता पसार झाले. ग्रामस्थांच्या जागरुकतेमुळे चोरांचा चोरीचा बेत फसला.

या घटनेची माहिती मिळताच या बॅकेशी निगडित असणार्‍या शेतकरी व ठेवीदारांचे धाबे दणाणले. या भागातील अनेक शेतकर्‍यांचे आर्थिक व्यवहार या बॅकेशी निगडीत आहेत. या घटनेमुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने सतर्क राहणे गरजेचे आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. घटनास्थळी औंध, पुसेसावळी पोलीस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले होते.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news