सातारा : दरोडेखोराच्या हल्ल्यात पुसेसावळीत चौघे जखमी, १२ तोळे सोन्यासह रोखड लंपास

सातारा : दरोडेखोराच्या हल्ल्यात पुसेसावळीत चौघे जखमी, १२ तोळे सोन्यासह रोखड लंपास
Published on
Updated on

पुसेसावळी,  पुढारी वृत्तसेवा: पुसेसावळी (ता. खटाव) येथे दरोडेखोरांनी बुधवारी पहाटेच्या सुमारास अक्षरश: थरकाप उडवला. एका घराचा कडी-कोयंडा तोडून दरोडा टाकला. दरोडेखोरांनी संबंधित कुटुंबातील चौघांना मारहाण करून 12 तोळे सोने, 1 लाख 30 हजार रुपयांची रोकड असा सुमारे 5 लाख 20 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. या मारहाणीत एक महिला गंभीर जखमी झाली आहे.

दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत जयश्री हणमंतराव माने गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर कराड येथे उपचार सुरू आहेत. याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, हणमंतराव माने कुटुंबीयांसमवेत रात्रीचे जेवण करुन झोपले होते. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास माने यांचे जावई फिर्यादी संजय आप्पासो कदम यांची पत्नी सारीका यांना घरात कोणीतरी आल्याची चाहूल लागली.

त्यांनी पती संजय यांना जागे केले. संजय यांनी दरोडेखोरांना हटकण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरोडेखोरांनी लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने कदम दाम्पत्यास मारहाण केली. तसेच त्यांच्या अंगावरील दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतले. बेडरुममध्ये झोपलेल्या जयश्री माने यांच्याकडेही काही दरोडेखोरांनी मोर्चा वळवला. त्यांनाही मारहाण केली. या मारहाणीत त्या गंभीर जखमी झाल्या.

यावेळी झालेल्या गोंधळामुळे वरच्या मजल्यावर झोपलेले हणमंतराव माने खाली आले. दरोडेखोरांनी त्यांनाही सोडले नाही. या चौघांना मारहाण करुन दरोडेखोरांनी सोन्याचा ऐवज व रोकड लंपास करुन पोबारा केला. जाताना त्यांनी घराला बाहेरुन कडी लावली. त्यामुळे कुटुंबियांनी फोन करुन शेजार्‍यांची मदत घेतली. दरोडेखोर सुमारे 30 ते 35 वयोगटातील असून ते मराठी बोलत होते. याप्रकरणी पुसेसावळी पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून तपास सपोनि प्रशांत बधे करत आहेत.

श्वान पथकाने ओढ्यापर्यत दाखवला मार्ग…

घटनास्थळी श्वान पथकाला पाचरण करण्यात आले होते. श्वानाने गावातील ओढ्यापर्यतचा मार्ग दाखवला, घटनास्थाळाला जिल्हा पोलिस प्रमुख अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधिक्षक अजित बोऱ्हाडे, उपविभागीय पोलिस अधिक्षक डॉ. निलेश देशमुख यांनी भेट देवून पाहणी केली.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news