ढेबेवाडी अत्याचार प्रकरणात संबंधितांवर कडक कारवाई करा : अजित पवार | पुढारी

ढेबेवाडी अत्याचार प्रकरणात संबंधितांवर कडक कारवाई करा : अजित पवार

सातारा, पुढारी वृत्तसेवा: ढेबेवाडी येथे झालेला अत्याचार ही दुर्दैवी घटना असून ही विकृती वेळीच ठेचण्याची गरज आहे. कोणताही दबाव न घेता पारदर्शकपणे या प्रकरणाची चौकशी करावी, संबंधितांचे गट व पक्ष यात सहभागी असल्यास त्याच्यावर ही कडक ॲक्शन घ्यावी, अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

या वेळी अजित पवार म्हणाले की, ढेबेवाडी प्रकरणात जिल्हा पोलिस प्रमुख अजयकुमार बन्सल यांच्याशी चर्चा झाली.  या प्रकरणी कोणताही दबाव न घेता पारदर्शकपणे चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दोषी कुठल्या गटाचे, पक्षाचे हे बघू नका. त्यांना पक्ष वगैरे काही नसतो. ही विकृती आहे त्यांना ठेचून काढले पाहिजे त्यांच्यावर कडक अ‍ॅक्शन घ्या, अशा सूचना दिल्या आहेत.

अशा घटना घडू नयेत यासाठी सर्व लोकांच्या मानसिकतेत बदल होण्याची गरज आहे. अशा घटना घडू नयेत म्हणून आपण खबरदारी घेतली पाहिजे. पालकांनीही आपल्या मुलांची काळजी घेतली पाहिजे. पोलिस यंत्रणेने सतर्क राहून अशा गोष्टी कानावर आल्यास संबंधितावर कारवाई केली पाहिजे, असे देखील त्यांनी सांगितले

हेही वाचलंत का? 

Back to top button