Murder : लोणंद पोलीस स्टेशन हद्दितील सालपे येथे एकाचा खून - पुढारी

Murder : लोणंद पोलीस स्टेशन हद्दितील सालपे येथे एकाचा खून

लोणंद (सातारा); पुढारी वृतसेवा : लोणंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सालपे (ता . फलटण) येथील एसटी थांब्या जवळ सायंकाळी अज्ञात कारणावरुन बापु संभाजी निकम (रा.शेरेचीवाडी (हिं), वय 38) याचा खून ( Murder ) करण्यात आला. याप्रकरणी आरोपी सौरभ संजय जगताप, गौरव संजय जगताप (दोघे रा. सालपे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यत लोणंद पोलीस स्टेशन मध्ये सुरू होती.

खून ( Murder ) घडल्यानंतर लोणंद पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या. या खूनप्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यत फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते.

बापू निकम यांचा मृतदेह पोस्टमार्टम करण्या करीता लोणंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि विशाल वायकर तपास करीत आहेत.

Back to top button