सातारा : कराड तालुक्यातील २०० गावांचे चक्री उपोषण तात्पुरते स्थगित | पुढारी

सातारा : कराड तालुक्यातील २०० गावांचे चक्री उपोषण तात्पुरते स्थगित

कराड : पुढारी वृत्तसेवा : ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी कराड तालुक्यातील २०० गावांचे चक्री उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

बुधवारी (दि. १३ सप्टेंबर ) रोजी ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी कराड तालुक्यातील सर्व २०० गावे चक्री उपोषणास बसणार असल्याचे कराड तालुका मराठा क्रांती मोर्चाकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र, ते तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी येथील दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर कराड शहरात मागील दोन दिवसांपासून तणावपूर्ण शांतता आहे. त्याचबरोबर पुसेसावळी घटनेच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आली आहे.

पुसेसावळी घटनेच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ नये, त्याचबरोबर मराठा क्रांती मोर्चाच्या लोकशाही मार्गाने सुरू असणाऱ्या आंदोलनास गालबोट लागू नये या हेतूने बुधवारपासून सुरू होणारे चक्री उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आल्याचे कराड तालुका मराठा क्रांती मोर्चाकडून जाहीर करण्यात आले आहे.

हेही वाचा : 

Back to top button