पिंपरी : झोपडपट्ट्यांतील समाज मंदिरात अभ्यासिका | पुढारी

पिंपरी : झोपडपट्ट्यांतील समाज मंदिरात अभ्यासिका

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  पिंपरी-चिंचवड शहरातील झोडपट्ट्यांमध्ये महापालिकेने 23 समाज मंदिर बांधले आहेत. तेथे नवी दिशा सर्वांगीण विकासाची या उपक्रमाअंतर्गत तेथे अभ्यासिका सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी खासगी एजन्सीमार्फत 8 झोपडपट्ट्यांत सर्वेक्षण करण्यात येत असून, त्यासाठी 12 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. शहरात घोषित व अघोषित असे एकूण 95 झोडपट्ट्या अस्तित्वात आहेत. त्या ठिकाणी सुमारे साडेचार ते पाच लाख नागरिक राहत आहेत. त्यापैकी 23 ठिकाणी महापालिकेने समाज मंदिर बांधले आहेत. त्या समाज मंदिराचा वापर विद्यार्थी व युवकांच्या विकासासाठी करण्यात येणार आहे. तेथे अभ्यासिका सुरू केली जाणार आहे. त्यासाठी आठ झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

पाणीपुरवठा, स्वच्छता व इतर पायाभूत सुविधा घराची खराब गुणवत्ता, झोपडपट्टीतील गर्दी, तेथील निवासी स्थितीचा अभ्यास सर्वेक्षणात केला जाणार आहे. तेथील रहिवाशांमध्ये सामाजिक, शैक्षणिक, आर्थिकस्तर विकसित करण्यात येणार आहे. नागरी सुविधा, सुनियोजित रस्ते, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छ स्वच्छतागृहे आदींचे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रबोधन करणे, सामाजिक शिक्षण देणे, रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणे व तांत्रिक शिक्षण आदी उपलब्ध करून देण्यासाठी माहिती गोळा करणे.

त्या संदर्भातील प्रकल्प अहवाल शेल्टर असोसिएट्स या खासगी एजन्सीने सादर केला आहे. ती एजन्सी आठ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील एका झोपडपट्टीत काम करणार आहे. रामनगर-आकुडी, रमाबाईनगर-आकुर्डी, गवळीमाथा-भोसरी, संजय गांधीनगर-मोशी, शांतीनगर-मोशी, शास्त्रीनगर-पिंपरी, काटे वस्ती-दापोडी, संजयनगर, वखार वस्ती-दापोडी या झोपडपट्ट्यांचे मॅपिंग व सर्वेक्षण केले जात आहे. तेथील पक्की व कच्ची घरे, स्वच्छतागृह व पाणी, कचरा, ड्रेनेज, प्रत्येक घरावर क्रमांक टाकणे. डेटा मॅपच्या आधारे घराचा डिजिटल पत्ता तयार करणे ही कामे एजन्सी करणार आहे. त्यासाठी 11 लाख 70 हजार इतका खर्च अपेक्षित आहे.

हेही वाचा : 

पवना बंदिस्त जलवाहिनी : प्रकल्प रखडल्याने दुपटीने वाढला खर्च

पिंपरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एटीबी, एटीसीला अलर्ट

Back to top button