सातारा : राजाभाऊ देशपांडे यांचे निधन; उद्या करवडी येथे अंत्यसंस्कार होणार | पुढारी

सातारा : राजाभाऊ देशपांडे यांचे निधन; उद्या करवडी येथे अंत्यसंस्कार होणार

कराड; पुढारी वृत्तसेवा

भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ देशपांडे यांचे आज (दि.११) वृद्धापकाळाने निधन झाले. ते शंभर वर्षाचे होते. सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची मुळे तळागाळात पोहचण्यात त्यांचा फार मोठा मोलाचा वाटा होता.

त्यांनी कराड लोकसभा मतदारसंघातून दोनवेळा कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून एक वेळ निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवली होती. नुकतीच वयाची शंभर वर्षे पूर्ण केलेल्या राजाभाऊ देशपांडे यांचा सत्कार केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी 25 सप्टेंबर रोजी त्यांच्या निवासस्थानी जाऊन केला होता. गेल्या महिन्यापासून त्यांची प्रकृती त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर अधिकच खालावली होती. देशपांडे यांच्या रूपाने भाजपाचा सर्वात जुना बुरुज कोसळला असल्याची प्रतिक्रिया अनेक मान्यवरांनी व्यक्त केली.

राजाभाऊ देशपांडे यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना नातवंडे, परतुंडे असा मोठा परिवार आहे.

दरम्यान राजाभाऊ देशपांडे यांच्या पार्थिवावर उद्या शनिवारी करवडी येथे त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राजाभाऊ देशपांडे यांचे पार्थिव त्यांच्या कराड येथील निवासस्थानी सकाळी सात ते नऊ या वेळेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. नऊ ते दहा या वेळेत त्यांच्या अंतयात्रा कराड शहरातून काढण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांचे पार्थिव करवडी येथे आणण्यात येणार आहे.

हे ही वाचलं का? 

 

Back to top button