IND vs PAK Match : भारत विरुद्ध पाकिस्तान पुन्हा ‘या’ दिवशी भिडणार | पुढारी

IND vs PAK Match : भारत विरुद्ध पाकिस्तान पुन्हा ‘या’ दिवशी भिडणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs PAK Match : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे निकालाविना संपला. अशा प्रकारे दोन्ही संघांना 1-1 गुण बहाल करणयत आले. याचबरोबर पाकिस्तानचा संघ 3 गुणांसह सुपर-4 साठी पात्र ठरला आहे. दरम्यान, भारतीय संघासमोर नेपाळचे आव्हान असणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ नेपाळला मात देऊन सुपर-4 साठी पात्र ठरेल. पण यानंतर या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहायला मिळेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

क्रिकेट चाहत्यांसाठी शनिवारचा दिवस निराशेचा ठरला. वास्तविक, 10 महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर भारत आणि पाकिस्तान संघ पुन्हा भीडले होते, चाहतेही या सामन्यचा उत्सुकतेने आनंद घेत होते. पण या ब्लॉकब्लस्टर सामन्यात पाऊस खलनायक ठरला आणि सामनाच रद्द झाला. असे असले तरी चाहत्यांनी निराश होण्याची गरज नाही. 10 सप्टेंबरला हे दोन्ही संघ आमनेसामने येतील असे नव्या समीकरणावरून स्पष्ट होत आहे. (IND vs PAK Match)

सुपर-4 मध्ये भारत विरुद्ध पाक सामना कधी होणार? (IND vs PAK Match)

आशिया चषक स्पर्धेत एकूण 6 संघ सहभागी झाले आहेत. त्यांच्या 2 गटांत विभागणी करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त नेपाळ ग्रुप-अ मध्ये आहे. तर ग्रुप-ब मध्ये श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांचा समावेश आहे. दोन्ही गटातील 2-2 संघ सुपर-4 साठी पात्र ठरतील. पाकिस्तान आणि भारत संघांनी ग्रुप-ए मधून सुपर-4 गाठली, तर वेळापत्रकानुसार 10 सप्टेंबर रोजी चाहत्यांना पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहायला मिळेल. हा सामना पल्लेकेले येथे होणार नसून कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर होईल. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना सुपर-4 फेरीत पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान महामुकाबला पाहायला मिळेल. या सुपर-4 फेरीनंतर अंतिम सामना 17 सप्टेंबर रोजी होणार आहे.

Back to top button