कराड: मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्यास कठोर शिक्षा व्हावी; विविध संघटनांसह नागरिकांच्या संतप्त भावना | पुढारी

कराड: मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्यास कठोर शिक्षा व्हावी; विविध संघटनांसह नागरिकांच्या संतप्त भावना

कराड: पुढारी वृत्तसेवा: सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात गुरूवारी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. ज्या नराधमाने आठ वर्षाच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केला आहे, त्यास पोलिसांनी गजाआड केले आहे. आता याप्रकरणी जलद गतीने तपास करून पोलिसांनी नराधमाविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करावे. तसेच लवकरात लवकर त्या नराधमास कठोरातील कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी शिवसेना, हिंदू एकता आंदोलन, हिंदू जनजागृती समितीच्या पदाधिकार्‍यांनी निवेदनाद्वारे कराड पोलिसांकडे केली आहे.

गुरूवारी संबंधित चिमुरडीचे आई – वडील कामानिमित्त घराबाहेर गेल्याची संधी साधत नराधमाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. संबंधित चिमुरडीला ठिकठिकाणी चावे घेतले होते. या धक्कादायक प्रकारानंतर संबंधित मुलीच्या नातेवाईकांनी कराड शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. या प्रकाराची माहिती होताच तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.

नराधमास कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख काकासाहेब जाधव, हिंदू एकता आंदोलन समितीचे अजय पावसकर, हिंदू जनजागृती समितीचे अनिल कडणे, गणेश कापसे यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी कराड पोलिसांची भेट घेत चर्चा केली. पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्याशी चर्चा करताना याप्रकरणी जलद गतीने तपास करून नराधमाविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र शक्य तितक्या लवकर दाखल करावे. तसेच हा खटल्याची सुनावणी जलद गतीने होऊन नराधमास कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली.

हेही वाचा 

Back to top button