महाबळेश्वरच्या केट्स पॉइंटवर वानरांच्या टोळीने पर्यटकांवर केला हल्ला

महाबळेश्वरच्या केट्स पॉइंटवर वानरांच्या टोळीने पर्यटकांवर केला हल्ला

सातारा, पुढारी वृत्‍तसेवा : महाबळेश्वर येथील केटस पॉइंटवर वानराच्या टोळीने लहान बालकावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. आत्तापर्यंत या माकडाच्या टोळीने तब्बल 180 जणांवर हल्ला केला असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.

स्थानिक वन समिती यांच्याकडे अनेक वेळा पर्यटकांनी तक्रारी करून देखील अद्यापही त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ घनदाट जंगलात असल्याने राज्यभरातून या ठिकाणी पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. आलेल्या पर्यटकांकडून या वानरांना सोबत आणलेला खाऊ हातामध्ये देताना अश्या काही घटना घडल्याचे समोर आले आहे.

.हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news