मुख्यमंत्री शिंदे अचानक सातारा दौऱ्यावर आल्याने चर्चांना उधाण | पुढारी

मुख्यमंत्री शिंदे अचानक सातारा दौऱ्यावर आल्याने चर्चांना उधाण

पाचगणी; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी दरे तांब येथे हेलिकॉप्टरने सुट्टीवर आले आहेत. मुख्यमंत्री शिंदे अचानक रजेवर गेल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा व तर्कवितर्कांना उधाण आले होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याची अधिकृतरीत्या माहिती समोर आलेली नाही. मुख्यमंत्री नेमक्या कोणत्या कारणासाठी सुट्टीवर आले आहेत, याबाबत सातारा जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. मुख्यमंत्र्यांचा तीन दिवस हा दौरा असेल, असे सांगितले जात आहे.

मुख्यमंत्री आपल्या गावी आलेत

मुख्यमंत्र्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांसोबत बैठक घेऊन ते गावी आले आहेत. मुख्यमंत्री शिंदे 24 ते 26 एप्रिल दरम्यान तीन दिवस सुट्टीवर आपल्या कुटुंबासह आले आहेत. या दरम्यान सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील शिंदे गटाचे नेते, कार्यकर्ते त्याचबरोबर भाजपचे नेते, कार्यकर्ते शिंदे यांची भेट घेण्यासाठी येत आहेत.

मुख्यमंत्री सुट्टीवर गेल्याने अनेक तर्कवितर्क

मुख्यमंत्री सुट्टीवर गेल्याने अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. सत्तासंघर्षाचा निकाल जवळ आला आहे. तसेच राज्यातील राजकीय वातावरण पाहता सर्वोच्य न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा 

Back to top button