सातारा : नितिन गडकरींच्या नागरी सत्काराला रामराजे नाईक निंबाळकर उपस्थित राहणार | पुढारी

सातारा : नितिन गडकरींच्या नागरी सत्काराला रामराजे नाईक निंबाळकर उपस्थित राहणार

फलटण : पुढारी वृत्तसेवा माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाला रामराजे नाईक निंबाळकर उपस्‍थित राहणार की नाही या विषयी काल (गुरूवार) पासून फलटण तालुक्यामध्ये राजकीय चर्चांना ऊत आला होता, मात्र आज (शुक्रवार) दुपारी या चर्चांना पूर्ण विराम मिळाला. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सभास्थळी उपस्थित राहणार असून, सभेमध्ये ते संबोधित करणार असल्याचे खात्रीशीर वृत्त दैनिक पुढारीच्या हाती आले असून, सभेनंतर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे राम मंदिर येथील राजवाडा या ठिकाणी भेट देणार आहेत.

हेही वाचा : 

Back to top button