सातारा : विक्रम पवारच्या तत्परतेमुळे विजेचा धक्का लागलेल्या वानराला जीवदान | पुढारी

सातारा : विक्रम पवारच्या तत्परतेमुळे विजेचा धक्का लागलेल्या वानराला जीवदान

परळी: पुढारी वृत्तसेवा : परळी परिसरातील सायळी गावाच्या हद्दीत विजेचा धक्का लागून जखमी झालेल्या वानराला विक्रम पवार याच्या तत्परतेमुळे जीवदान मिळाले. वानरावर वनखात्याच्या सातारा कार्यालयात आणून उपचार करण्यात आले. त्यानंतर सातारचे वनक्षेत्रपाल निवृत्ती चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वानराला अधिवासात सोडण्यात आले.

परळी परिसरातील सायळी गावाच्या हद्दीत विजेचा धक्का लागून एक वानर जखमी अवस्थेत पडले होते. याची माहिती कातकरी समाजातील विक्रम पवार याला मिळाली. त्याने क्षणाचा ही विलंब न लावता त्या वानराला उचलून दुचाकीवरून परळीत आणले. मात्र, पशु वैद्यकीय दवाखाना बंद असल्याने त्यांने परळीतील ग्रामस्थांच्या माध्यमातून याची माहिती वनखात्याचे अधिकारी साधना राठोड, अशोक मलप यांना दिली.

या अधिकाऱ्यांनी तत्काळ वनविभागाची गाडी पाठवून त्या वानराला उपचारासाठी सातारा कार्यालयात आणण्यात आले. त्याच्यावर उपचार करून त्याला त्याच्या अधिवासात सोडण्यात आले. विक्रम पवार याच्या तत्परतेमुळे वानरला जीवदान मिळाले. त्यामुळे त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी वनरक्षक (ठोसेघर) अशोक मलप, वनपाल अरुण सोलंकी, रेस्क्यु टीमचे ओंकार ढाले, लोकेश रिटे, पवन शिर्तोडे, मयूर गुजर, दिनकर देवरे यांचे सहकार्य लाभले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button