कराड : कोयनानगर जवळ बिबट्या कुत्र्याचा पाठलाग करत घरात शिरला

बिबट्या
बिबट्या
Published on
Updated on

कराड; पुढारी वृत्तसेवा कोयनानगर जवळ हेळवाक (ता. पाटण, जि. सातारा) येथे सुधीर कारंडे यांच्या राहत्या घरात बिबट्या शिरल्‍याची घटना घडली. वनविभागाच्या पथकाने त्वरित घटनास्थळी पोहोचून सदर बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केले. ही घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली. सुधीर कारंडे यांच्या घरातील सर्वजण दुर्गादेवी विसर्जनासाठी घराबाहेर गेले होते. त्यावेळी बिबट्या कुत्र्याचा पाठलाग करत घरात शिरला. नेमके त्याच दरम्यान कारंडे घराकडे आले आणि त्यांनी बिबट्या घरात शिरल्याचे पाहून घराचे दार बंद केले.

त्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती वन विभागाला दिली. वनविभागाच्या सर्व टीम त्वरित घटनास्थळी पोहोचली. त्यांनी घरात घुसलेल्‍या बिबट्याला यशस्वीरीत्या पिंजऱ्यात पकडले. वन्यजीव विभागाचे वनक्षेत्रपाल (हेळवाक) संदीप जोपाळे, वनक्षेत्रपाल (कोयना) संदीप कुंभार व वन्यजीव विभागाचे वनपाल व वनरक्षक हे तत्परतेने घटनास्थळी पोहचले. त्यांनी बिबट्याला यशस्वीरीत्या पिंजऱ्यात जेरबंद केले. सदर बिबट्या हा लहान (वर्षभराचा) आहे, मागील उजव्या पायाने तो लंगडत असल्‍याचे दिसून आले. या बिबट्यास विभागीय वनाधिकारी विशाल माळी यांच्या सूचनेनुसार पुढील वैद्यकीय उपचारासाठी हलविण्यात येणार आहे.

बिबट्यास सुखरुप पकडण्यासाठी विभागीय वनाधिकारी विशाल माळी, सहायक वनसंरक्षक तुषार ढमढेरे, वनक्षेत्रपाल संदीप जोपाळे, वनक्षेत्रपाल संदीप कुंभार व सर्व वन्यजीव विभागाच्या कर्मचार्‍यांनी अथक प्रयत्न केले. तसेच स्थानिक ग्रामस्थांनीही मोठे सहकार्य केले.

हेही वाचा :  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news