सातारा : घरावर दगडफेक करत टोळक्याची दहशत; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण | पुढारी

सातारा : घरावर दगडफेक करत टोळक्याची दहशत; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सातारा ; पुढारी वृत्तसेवा- सातारा शहरालगत असलेल्या समर्थनगर ग्रामपंचायतीजवळ काही अज्ञात व्यक्तींनी एका घरावर तुफान दगडफेक व दारूच्या बाटल्या फेकत दहशत माजवली. ही घटना (रविवार) मध्यरात्री घडली. या घटनेमुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या विषयी मिळालेल्‍या माहितीनुसार, आठ ते दहा जणांच्या टोळक्याने समर्थ नगर ग्रामपंचायतजवळील एका घरावर तुफान दगडफेक केली. यावेळी दारूच्या बाटल्‍याही फेकण्यात आल्‍या. या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून टोळक्‍याकडून रात्री उशिरापर्यंत फिरणे, परिसरात उच्छाद घालणे यासारखे प्रकार होत आहेत. त्‍यांना परिसरातील नागरिकांकडून अटकाव केल्यानेच त्यातून हा प्रकार घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान या घटनेनंतर शहर पोलिसांना माहिती देताच गस्त पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा :  

Back to top button