Rajasthan political crisis : गेहलोत समर्थकांनी ठेवल्या ‘या’ दोन अटी

Rajasthan political crisis : गेहलोत समर्थकांनी ठेवल्या ‘या’ दोन अटी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : Rajasthan political crisis राजस्थानमध्ये सध्या मुख्यमंत्री कोण होणार यावरून काँग्रेसमध्ये सध्या घमासान सुरू आहे. यासाठी काल जयपूर येथे काँग्रेची बैठक बोलवण्यात आली होती. ही बैठक रात्री उशिरापर्यंत चालली. तत्पूर्वी गेहलोत समर्थक 82 आमदारांनी आपले राजीनामे विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्त केले. गेहलोत यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या आमदारांच्या दोन अटी आहेत. त्या अशा…

पहिली अट म्हणजे मुख्यमंत्र्यांचा उत्तराधिकारी असा असावा ज्याने 2020 मधील राजकीय संकटाच्या वेळी सरकारला वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती, ती पाडण्याच्या प्रयत्नात सामील असलेला कोणी नसावा.

दुसरी अट अशी की, काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक होईपर्यंत त्यांना काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक नको आहे. जे 19 ऑक्टोबर रोजी आहे.

Rajasthan political crisis मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या 82 आमदारांनी रविवारी रात्री सामूहिक राजीनामे दिले. त्यामुळे राजस्थानातील राजकीय पेच अधिकच चिघळला आहे. एकीकडे या घडामोडी घडत असताना काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी गेहलोत आणि त्यांचे स्पर्धक असलेले सचिन पायलट या दोघांनाही तातडीने दिल्लीला पाचारण केले आहे.

मुख्यमंत्रिपदासाठी हाय कमांडचा कौल सचिन पायलट यांना आहे. गेहलोत गट त्यामुळे नाराज झाला आहे. विधिमंडळ पक्ष बैठकीपूर्वीच गेहलोत गोटातील जवळपास 82 आमदारांनी विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी यांच्या निवासस्थानी जाऊन राजीनामे सादर केले आहेत. दुसरीकडे मंत्री तसेच गेहलोत गटातील प्रताप सिंह खाचरियावास यांनी त्यांच्याकडे 92 आमदार असल्याचा दावा केला आहे. काँग्रेसविरोधात बंडखोरी करणार्‍यांतून कुणालाही मुख्यमंत्री करण्यात येऊ नये, एवढीच आमची मागणी आहे. खाचरियावास यांचा रोख अर्थातच पायलट यांच्याकडे आहे. हाय कमांडने अशोक गेहलोत, सचिन पायलट, अजय माकन आणि मल्लिकार्जुन खर्गे यांना दिल्लीला पाचारण केले आहे. गेहलोत आणि पायलट दोघांमध्ये समझोता घडवून आणण्याचा प्रयत्न हाय कमांडकडून केला जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Rajasthan political crisis तत्पूर्वी सचिन पायलट त्यांचे समर्थक आमदार आणि अन्य काही आमदार विधिमंडळ पक्ष बैठकीसाठी 'सीएम हाऊस'ला दाखल झाले. तत्पूर्वी मुख्यमंत्री गेहलोत, निरीक्षक खर्गे, प्रदेश प्रभारी अजय माकन हेही हजर झालेले होते. पण आमदारच उपस्थित नसल्याने बैठक रद्द झाली.

राजस्थानातील आगामी मुख्यमंत्री कोण हे ठरविण्यासाठी रविवारी जयपुरात बोलावण्यात आलेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत एकुणात काँग्रेस अंतर्गत गटबाजीचे प्रदर्शन घडले. एक तर पक्षाचे निम्मेच आमदार बैठकीला आलेे होते. बहुतांश आमदारांनी गेहलोत हेच मुख्यमंत्रिपदीही हवेत म्हणून आग्रह धरला. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आगामी मुख्यमंत्री कोण, यावर चर्चाही झाली नाही. मंत्री राजेंद्र गुढा हे निम्मेच आमदार बैठकीला आलेले असल्याने बहुमताने फैसला होणे शक्य नाही, असे सांगून निघून गेले. काँग्रेसच्या एकूण 107 आमदारांपैकी निम्म्याहून कमी बैठकीला हजर होते. पुढे हे आमदारही तावातावात निघून गेले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news