सातारा : गणपती विसर्जनास गेलेला तरूण वीर धरणात बुडाला | पुढारी

सातारा : गणपती विसर्जनास गेलेला तरूण वीर धरणात बुडाला

लोणंद; पुढारी वृतसेवा : गणपती विर्सजनास वीर धरणात गेलेल्या लोणंद एमआयडीसीमधील तरूण कामगार बुडाल्याची भिती व्यक्त केली जात आहे. लोणंदच्या एका कंपनीतील कामगार गणपती विर्सजन करण्यासाठी वीर धरणामध्ये गेला असता, गणपती विर्सजन करताना पाण्यात बुडाल्याची घटना घडली.

बुडालेल्या कामगाराचे नाव संताराम गौर (रा. सुल्तानपुर, उत्तर प्रदेश) असल्याचे सांगण्यात आले आहे. बुडालेल्या कामगाराचा शिरवळ पोलिसांनी शोध मोहिम सुरू केली असून, त्याच्या शोधासाठी पाचगणी येथील रेस्क्यू टीम पाचारण केली आहे. वीर धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने बुडालेला तरुण सापडण्यास अडचण निर्माण होत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. शोधमोहिम सुरू असून बुडालेल्या या तरूणाचे नातेवाईक काठावरच बसून आहेत.

हेही वाचा:

Back to top button