माता न तू वैरिणी! स्वत:च्या मुलाला अमानुष मारहाण; हात मोडला, अंगावर दिले चटके | पुढारी

माता न तू वैरिणी! स्वत:च्या मुलाला अमानुष मारहाण; हात मोडला, अंगावर दिले चटके

सातारा : पुढारी वृत्तेसवा : प्रेम प्रकरणातून आपल्याच सहा वर्षाचा लहान मुलाचा अमानुष छळ केल्याचा धक्कादायक प्रकार साताऱ्यात घडला आहे. या महिलेने पोटच्या गोळ्याला एवढी बेदम मारहाण केली आहे की त्यात या मुलाचा हात मोडला असून अनेक ठिकाणी चटके दिले आहेत. त्यामुळे या मुलाच्या अंगावर फोड आल्याने अंगावर, पाठीवर खूपच जखमा दिसत आहेत.

शिरवळचे वैद्यकीय अधिकारी सुदर्शन गोरे यांच्या जागरूकतेमुळे हा सगळा अंगावर काटा आणणारा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे आईच झाली कैदासीन म्हणण्याची वेळ आली आहे. या क्रूर महिलेला शिरवळ पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, या महिलेविरोधात कोणीही तक्रार द्यायला तयार नसल्याने शेवटी प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून देण्यात आले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button