जावळीत वडाचे म्‍हसवे गावात बिबट्या घुसला; ग्रामस्थांमध्ये दहशत | पुढारी

जावळीत वडाचे म्‍हसवे गावात बिबट्या घुसला; ग्रामस्थांमध्ये दहशत

पाचगणी; पुढारी वृत्तसेवा जावळी तालुक्यातील वडाचे म्हसवे गावात काल (शनिवार) रात्री बिबट्याने दहशत माजवली. किल्ले वैराटगडाच्या घनदाट झाडीतून बिबट्या म्हसवे गावातील चव्हाण अळी मध्ये एका शेतकऱ्याच्या घरात घुसला. यामुळे लगत असणाऱ्या कोंबडीच्या खुराड्यामधील सर्व कोंबड्या बिबट्याने फस्त केल्या. त्यामुळे म्हसवे गावात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

तात्काळ जावळी तालुका वनविभागाने बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. जावळी तालुक्यातील विवर हातगेघर रानगेघर विवर कावडी परिसरात काही महिन्यांपूर्वी बिबट्याने दहशत माजवली होती. आता बिबट्याने आपला मोर्चा वैराटगडाच्या पायथ्याला असणाऱ्या वडाचे म्हसवे या गावाकडे वळवला आहे. रात्री नागरी वस्तीत बिबट्या घुसून एका शेतकऱ्याच्या घरात कोंबडीच्या खुराड्यात जाऊन त्यानं कोंबड्या फस्‍त केल्‍याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे तात्काळ वन विभागाने बिबट्याला जेरबंद करावे आणि नागरिकांचे संरक्षण करावे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

हेही वाचा :   

Back to top button