सातार्‍यात जादूटोणा करून युवतीवर बलात्कार : एकास अटक | पुढारी

सातार्‍यात जादूटोणा करून युवतीवर बलात्कार : एकास अटक

सातारा : पुढारी वृत्तसेवा : सातार्‍यात तरुणीला खोलीमध्ये नेऊन तिच्या डोक्यावरून लिंबू फिरवून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. दरम्यान, ही घटना शनिवार, दि. 20 रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली आहे.

बेळगाव : बळ्ळारी पोलिसांनी सोडले, हुबळी पोलिसांनी पकडले

मुक्तार नासीर शेख (वय 24, रा. राजसपुरा पेठ, सातारा) असे पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मुक्तार शेख याने 23 वर्षीय पीडित तरुणीला एका रूममध्ये नेले. या ठिकाणी त्याने तिच्या डोक्यावरून लिंबू फिरवून तिला भूरळ पाडली. युवतीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन तिला बेडवर ढकलून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. बलात्कारानंतर युवती घाबरली होती. या पीडित युवतीने सर्व प्रकार कुटुंबियांना सांगितला.

त्यानुसार कुटुंबियांनी शाहूपुरी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर शनिवारी रात्री युवतीने मुक्तार शेख याच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी मुक्तार शेखवर बलात्कार आणि जादूटोणा प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन अटक केली. दरम्यान, नेमकी घटना काय आहे? याचा पोलिस तपास करत आहेत.

युवतीवर बलात्कार; राजस्थानच्या युवकावर गुन्हा

बेळगाव : तिगडी क्रॉसजवळ अर्धा किलो गांजा जप्त

 

Back to top button