सातारा : कोयना धरणातून विसर्ग वाढणार | पुढारी

सातारा : कोयना धरणातून विसर्ग वाढणार

पाटण, पुढारी वृत्तसेवा : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे आज सकाळी 10 वाजता कोयना धरणाचे वक्र दरवाजे 3 फुटांवर उघडण्यात येणार आहेत. 18,780 क्यूसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.

धरण पायथा विद्युत गृहामधून 2100 क्यूसेक्स विसर्ग चालू आहे. कोयना धरणातून नदीपात्रात एकूण 20,880 क्यूसेक्स विसर्ग सुरू राहणार आहे. त्यामुळे कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. १०५ टीएमसी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरणात 93.87 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

हेही वाचा

Back to top button