मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दरेगावी मुक्कामी | पुढारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दरेगावी मुक्कामी

बामणोली: पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दि. ११ व १२ ऑगस्ट रोजी सातारा जिल्ह्यातील त्यांच्या दरे या गावी दोन दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत. दरे येथील निवासस्थानी त्यांचा मुक्काम असणार आहे.

मुख्यमंत्री ठाणे येथील त्यांच्या नंदनवन या निवासस्थानातून दुपारी साडेबाराच्या सुमारास महाबळेश्वरकडे येणार आहेत. महाबळेश्वरमधून सायंकाळी सहाच्या सुमारास ते तापोळा येथे जाणार आहेत. तापोळा येथील पद्मावती देवीच्या मंदिरात ग्रामस्थांकडून जंगी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. येथील कार्यक्रम आटोपल्यावर मुख्यमंत्री दरे गावी मुक्कामी जाणार आहेत. शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शुभहस्ते ग्रामदैवत जननी देवीच्या मंदिरात देवीच्या मूर्तीला अभिषेक, पूजा व आरती होणार आहे.

गेली दोन दिवस तापोळा बामणोली कांदाटी खोरे या संपूर्ण परिसरात धो धो कोसळणाऱा पाऊस व वादळी वाऱ्याने ठिकठिकाणी विद्युत पोल पडल्याने बहुतांश भाग हा अंधारात आहे. बीएसएनएलचे नेटवर्क नसल्याने संपूर्ण १०५ गावे संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गावी दौऱ्यावर येत असताना नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीमुळे या भागातील लाईट व नेटवर्क सेवा ठप्प झाली आहे.

हेही वाचा

Back to top button