शंभूराज देसाई यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी : कार्यकर्त्यांचा साताऱ्यात जल्लोष

शंभूराज देसाई यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी : कार्यकर्त्यांचा साताऱ्यात जल्लोष

सातारा: पुढारी वृत्तसेवा : शिंदे गटातील आमदार शंभूराज देसाई यांची शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्याने मल्हारपेठ येथील कार्यकर्त्यांनी साताऱ्यात शंभूराज देसाई यांच्या पोवई नाक्यावरील निवासस्थानी येऊन फटाके वाजवून जल्‍लाेष केला. शंभूराज देसाई यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ दुसऱ्यांदा पडली आहे. देसाई यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा देण्यासाठी मल्हारपेठ येथून आलेल्या कार्यकर्त्यांनी साताऱ्यात येऊन आनंद साजरा केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार आज झाला. मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गट व भाजपकडून प्रत्येकी ९ जणांनी कॅबिनेटमंत्री पदाची शपथ घेतली. यामध्ये भाजपचे राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), चंद्रकांत पाटील (कोथरूड), सुधीर मुनंगटीवार (बल्लारपूर), विजयकुमार गावीत, गिरीश महाजन, सुरेश खाडे, रवींद्र चव्हाण, अतुल सावे (औरंगाबाद पूर्व), मंगलप्रभात लोढा (मुंबई) यांनी शपथ घेतली. शिंदे गटाचे संजय राठोड, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील, अब्दूल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई (पाटण) यांनी कॅबिनेटमंत्री पदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळा राजभवन येथे संपन्न झाला.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news