रेठरे येथे महादेव मंदिराचे सुशोभीकरण | पुढारी

रेठरे येथे महादेव मंदिराचे सुशोभीकरण

रेठरे बु : पुढारी वृत्तसेवा रेठरे बुद्रुक ता. कराड येथील शंभो महादेव अर्थात शिवशंकराचे आधिष्ठान असलेल्या मंदिरात श्रावणी सोमवार निमित्त भाविकांनी गर्दी केली होती. पुराणकाळातील या मंदिराचा ग्रामस्थ, तसेच दानशूर व्यक्‍तींनी पुढाकार घेऊन जीर्णोद्धार केला आहे. त्यामुळे गावच्या वैभवात भर पडली आहे.

कृष्णाकाठी असलेल्या या गावात पूर्वीच्या अनेक देव, देवतांचे मंदिरे आहेत. काही दिवसांपूर्वी जोतिबा मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्यामुळे गावाचा लूकच बदल्याचे दिसून आले. महादेव मंदिर कृष्णा नदीकाठी असून य. मो. कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन मदनराव मोहिते यांच्या पुढाकाराने काही वर्षापूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता. त्यानंतर आता ग्रामस्थ तसेच दानशूर व्यक्‍तींच्या मदतीच्या सहाय्याने मंदिराची डिजाईन, रंग रंगोटी, ग्रेलिंग तसेच रोषणाई केल्याने मंदिराबरोबर गावच्याही वैभवात भर पडली आहे. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात श्रावण सोमवारी तसेच इतर दिवशीही पूजा, अभिषेक घालण्यासाठी रेठरे तसेच बाहेर गावचे भक्‍त याठिकाणी येत असतात.

महादेव मंदिर हे भाविकांचे श्रध्दास्थान आहे. मंदिराचे सुशोभीकरण होणे गरजेचे होते. गावात पुराणकाळातील अनेक मंदिरे आहेत. त्यांचाही जीर्णोद्धार होण्यासाठी सहकार्य होणे गरजेचे आहे.
– सौ. शामबाला घोडके, जि.प.सदस्या

हेही वाचा

Back to top button