सातारा : भुईंज येथे मिनी ट्रॅव्हल्सला ट्रकची धडक : ६ जण गंभीर जखमी | पुढारी

सातारा : भुईंज येथे मिनी ट्रॅव्हल्सला ट्रकची धडक : ६ जण गंभीर जखमी

कुडाळ : पुढारी वृत्तसेवा : पुणे – बंगळूर महामार्गावरील भुईंजजवळ ट्रकने पुण्याकडे निघालेल्या मिनी ट्रॅव्हल्सला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात ट्रॅव्हल्समधील ५ ते ६ जण गंभीर जखमी झाले. ही घटना आज (दि.२) दुपारी घडली. जखमींना सातारा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, पुणे – बंगळूर महामार्गावरील भुईंजजवळ ट्रकने पुण्याकडे निघालेल्या मिनी ट्रॅव्हल्सला पाठीमागून जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होते की, मिनी ट्रॅव्हल्सचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी भुईंज पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पोलीस दाखल झाले आहेत. पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. तपास भुईंज पोलीस करत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button