Al Zawahiri : बाल्कनीत आला आणि खेळ खल्‍लास..! ‘सीआयए’च्‍या गुप्‍त बैठकीत असा ठरला जवाहिरीला टिपण्‍याचा ‘प्‍लॅन’ | पुढारी

Al Zawahiri : बाल्कनीत आला आणि खेळ खल्‍लास..! 'सीआयए'च्‍या गुप्‍त बैठकीत असा ठरला जवाहिरीला टिपण्‍याचा 'प्‍लॅन'

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अल- कायदा संघटनेचा म्होरक्या अयमान अल-जवाहिरी ( Al Zawahiri ) याचा अमेरिकेने  खात्मा केला आहे. ओसामा बिन लादेन याच्‍यानंतर अल-कायदा संघटनेला हा मोठा झटका आहे. गेली अनेक वर्ष अमेरिका जवाहिरीच्‍या मागावर होती. जवाहिरी याचा खात्‍मा करण्‍यासाठी एकूणच अमेरिकेची गुप्‍तहेर संघटना ‘सी.आय.ए.’ने कसा प्‍लॅन आखला. दहशतवाद्‍यांचे कबंरडे माेडणारा हा फ्‍लॅन कसा यशस्‍वी केला, हे जाणून घेवूया…

आधी ओसामा आता जवाहिरी…

अमेरिकेने पाकिस्‍तानमध्‍ये धडक कारवाई करत कुख्‍यात ओसामा बिन लादेनचा खात्‍मा केला होता. यानंतर अल-कायदाची सूत्रे जवाहिरी याने स्‍वीकारली होती. मागील अनेक वर्ष अमेरिका त्‍याच्‍या मागावर होती. जवाहिरी आपल्‍या टप्‍प्‍यात आल्‍याचे स्‍पष्‍ट झाल्‍यानंतर ‘सीआयए’ने अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष ज्‍यो बायडेन यांच्‍याबरोबर बैठक घेतली. यामध्‍येच जवाहिरीच्‍या खात्‍मा करण्‍याची योजना आखली.

जवाहिरी अफगाणिस्‍तानमध्‍ये असल्‍याची मिळाली माहिती

सीआयएला संशय होता की, जवाहिरी हा पाकिस्‍तान किंवा अफगाणिस्‍तानमध्‍ये लपून बसला आहे. अल-कायदा या दहशतवादी संघनेच्‍या नेटवर्कची माहिती अमेरिका घेत होतीच. अमेरिकेने अफगाणिस्‍तानमधील आपले सैन्‍य मागे घेतले. यानंतर येथे अल-कायदा आपले हातपाय पसरणार हे स्‍पष्‍ट होते. काबूलमध्‍ये अल-कायदाचे दहशतवादी आश्रयासअसल्‍याची माहिती सीआयएला मिळली आणि यानंतर सुरु झाला जवाहिरीच्‍या खात्‍मा करण्‍याची योजना.

Al Zawahiri : खात्री करण्‍यासाठी अनेक महिने पाठपुरावा

जवाहिरी हा आपल्‍या पत्‍नी आणि मुलांसह काबुलमधील एका घरात वास्‍तव्‍यास असल्‍याची माहिती सीआयएला मिळाली. माहिती होती. मात्र माहिती मिळालेला व्‍यक्‍ती हा जवाहिरीच आहे का, याची खात्री करणे आवश्‍यक होते. यासाठीसीआयएच्‍या सुरक्षा अधिकार्‍यांनी अनेक महिने पाठपुरावा केला. यानंतर एप्रिल २०२२ पासून काबूलमध्‍ये वास्‍तव्‍यास सर्व घडामोडींचा तपशील वरिष्‍ठ प्रशासकीय अधिकार्‍यांना पुरविण्‍यात आली. तसेच याची माहिती अमेरिकेचे राष्‍ट्रीय सुरक्षा सल्‍लागार जेक सुविलन यांनी राष्‍ट्रपती ज्‍यो बायडन यांना दिली.

जवाहिरी राहत असलेल्‍या परिसराची मिळवली इंत्‍यभूत माहिती

काबुलमधील एका घरात जवाहिरीच राहत असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. यानंतर सीाआयएने त्‍याच्‍या घराची इत्‍यंभूत माहिती मिळवण्‍यास सुरुवात केली. जवाहिरीने आश्रय घेतलेले घर कसे आहे. तिथे जाण्‍याचे रस्‍ते आणि अन्‍य सर्व बाबींची माहिती घेण्‍यात आली. यानंतर १ जुलै रोजी सीआयएचे संचालक विल्‍यम बर्न्स यांनी अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष ज्‍यो बायडेन आणि मंत्रीमंडळातील काही समोर हा जवाहिरीला पकडण्‍याच्‍या योजनेची माहिती दिली. हे ऑपरेशन कसे होइल. तसेच जवाहिरीच्‍या घराच्‍या मॉडेलची माहितीही सुरक्षा अधिकार्‍यांना दिली.

अट एकच कमीत कमी रक्‍तपात आणि केवळ जावाहिरीलाच टिपायचे..

२५ जुलै रोजी जवाहिरीवरील हल्‍ल्‍याचे नियोजन ठरले. या बैठकीत कमीत कमी रक्‍तपातामध्‍ये जवाहिरीचा खात्‍मा करा, असा आदेश राष्‍ट्राध्‍यक्ष ज्‍यो बायडेन यांनी दिला. या कारवाईत लहान मुले, महिला व अन्‍य नागरिकांना कोणताही धोका होवू नये, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले होते. त्‍यामुळे सीआयएसाठी हे ऑपरेशन राबवणे खूपच आव्‍हानात्‍मक होते. मात्र नेहमीच प्रत्‍येक कसोटीमध्‍ये पास होणार्‍या अमेरिकेच्‍या या विभागाने हे आव्‍हान स्‍वीकारले.

जवाहिरी बाल्‍कनीत आला आणि ड्रोनने अचूक वेध घेतला

जवाहिरीचा खात्‍मा करा;पण या कारवाईत निदोष नागरिकांना धक्‍काही लागू नये, असे आदेशच अमेरिकेच्‍या राष्‍ट्राध्‍यक्षांनी दिले होते. यामुळे जवाहिरी याला एकटयाला गाठणे हेच मोठे आव्‍हान होते. त्‍यामुळे तो घराच्‍या बाल्‍कनीत जेव्‍हा एकटा येईल तेव्‍हाच हल्‍ला करायचा असे ठरलं. अखेर ३१ जुलै राजी जवाहिरी हा आपल्‍या घराच्‍या बाल्‍कनीत एकटाच आला. बाल्‍कनीत येताच सीआयएने त्‍याला अचूक ड्रोन हल्‍ला करत त्‍याला टिपले. तो बाल्‍कनीत आला आणि आपसूक सीआएच्‍या जाळ्यात सापडला. सीआयएने ज्‍या अचूकपणे ही कामगिरी केली त्‍याचे जगभरात कौतूक होत आहे. आणि या संघटनेने पुन्‍हा एकदा जगातिक उत्‍कृष्‍ट सुरक्षा संघटना असल्‍याचे आपल्‍या कामगिरीने सिद्‍ध केले आहे.

Back to top button