कडेगाव यात्रेत बगाडाच्या चाकाखाली भाविकाचा मृत्यू | पुढारी

कडेगाव यात्रेत बगाडाच्या चाकाखाली भाविकाचा मृत्यू

वाई ; पुढारी वृत्तसेवा : कडेगाव, (ता. वाई) येथील जनाई देवीच्या यात्रेच्या मिरवणुकीत छोट्या बगाडाचे दगडी चाक छातीवरून गेल्याने सागर माधवराव मुरूमकर (वय 30) हे ठार झाले. शनिवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली.

कडेगावमधील ग्रामदैवत जानाई देवीची मिरवणूक निघते. यावेळी छोट्या बगाडावर मानकरी बसलेले असतात. शनिवारी बगाडाच्या मिरवणुकीवेळी बगाड वेशीवर जाऊन परत गावाकडे येत असताना बगाड शेतामध्ये अडकला. बैलांकडून बगाड ओढून बाहेर काढत असताना सागर मुरूमकर हे बगाडावरून खाली कोसळले.

यावेळी मुरूमकर यांच्या छातीवरून बगाडाचे दगडी चाक गेल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी संग्राम मुरूमकर यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेत अन्य दोघे जखमी झाले.

Back to top button