

कराड, पुढारी वृत्तसेवा : स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत कराड नगरपालिकेने सलग दोनदा देशात पहिला क्रमांक मिळाला आहे. ब्लॅक सोल्जर फ्लॉय (बीएसएफ) हा प्रकल्प राबवणारी कराड नगरपालिका देशात पहिला पालिका ठरली आहे.
अद्रिशा बायोलॉजिकचे संचालक डॉ. चारूदत्त आपटे यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, "या प्रकल्पातून शहरातील दररोज सुमारे साडे सात टन कचर्याचे विघटन केले जाईल. सध्या प्रायोगिक तत्वावर दररोज एक टन कचर्याचे विघटन करण्याचे काम सुरू आहे".
आपल्या देशातील शहरांमध्ये कचर्याची समस्या असून आपल्यात नागरी शिस्तीचा अभाव आहे. प्रत्येकाने मनावर घेवुन आपल्या. आजुबाजुचा कचरा एकत्र करुन ब्लॅक सोल्जर फ्लायला दिला तर त्यातुन खत, खाद्य व अर्थकारण आकाराला येईल. आणि यातून पालिकेला उत्पन्न मिळू शकणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा