सातारा : जिल्ह्यातील 229 शाळा अवघड क्षेत्रात

शाळा अवघड क्षेत्रात
शाळा अवघड क्षेत्रात
Published on
Updated on

सातारा : प्रवीण शिंगटे
सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची कार्यवाही सुरू झाली आहे. शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यासाठी जिल्ह्यातील अवघड क्षेत्रात मोडणार्‍या शाळांची यादी प्राथमिक शिक्षण विभागामार्फत प्रसिध्द करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 229 शाळा अवघड क्षेत्रात मोडत आहेत. दि. 2 एप्रिलपर्यंत या शाळांबाबत गटशिक्षणाधिकार्‍यांकडे हरकती सादर करता येणार आहेत. अवघड क्षेत्रातील सर्वात जास्त शाळा महाबळेश्‍वर व पाटण तालुक्यातील आहेत.

शिक्षकांच्या बदल्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अवघड क्षेत्रात समाविष्ट झालेल्या शाळांनी 7 निकषांपैकी 4 किंवा त्यापेक्षा जास्त निकष पूर्ण केले आहेत. प्राप्त झालेल्या हरकतीबाबत दि. 4 एप्रिल रोजी 11 वाजेपर्यंत विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांनी छाननी करून शिफारशी व अभिप्राय सादर करावेत. यानंतर तक्रार व आक्षेप विनंती अर्जाचा विचार केला जाणार नसल्याच्या सूचना विनय गौडा यांनी दिल्या आहेत.

अवघड क्षेत्रात जावली तालुक्यातील कास, उंबरी चोरगे, उंबरीवाडी, आंबवडे, पिसाडी, कात्रेवाडी, वेळेढेण, तळदेव मायणी, खिरखंडी, मुनावळे, कुंभारगणी, रेंडीमुरा, भोगवली मुरा, खिलारमुरा, मरडमुरे, दिवदेव, म्हाते मूरा, निपाणी मुरा अशा 18 शाळांचा समावेश आहे.
कराड तालुक्यातील गोपाळवाडी, खोडजाईवाडी या दोन शाळांचा समावेश आहे. महाबळेश्‍वर तालुक्यातील तळदेव, देवळीमुरा, देवळी, पातूट 1, मालूसर 1, घावरी, विवर, बिरमानी, कुमठे-कोंढोशी, दुधोशी, दरे, झांजवड, कासरूड, दूधगांव, चतूरबेट, कलमगाव, कलमगाव मुरा, घोणसपूर, शिरवली, गोरोशी, हातलोट, बिरवाडी, तापोळा, नावली अहिरे, लाखवड, रामेघर, वासरोली कोळी, वारसोली देव, वेलापूर, वानवली, आटेगांव, हारचंडी, रूळे, गावढोशी , वाळणे, आवळण, अहिर, गाढवली, दरे तांब, पिंपरी तांब, येरणे बु., आचली, देवसरे, सौंदरी, सोनट, कुरोशी, खांबील पोळके, खांबील चोरगे, वेंगळे, खरोशी, दाबेदाबेकर, शिरनार, रेणोशी, कळमगाव, कोट्रोशी, बुरधनी कोट्रोशी, आमशी, दाबेमोहन, लामझ, लामझमुरा, आकल्पे, निवळी, पारवट, वाघावळे, साळोशी, कांदाट, उचाट, वळवण अशा 71 शाळांचा समावेश आहे.

पाटण तालुक्यातील मराठवाडी, धनगरवाडा मरड, भिकाडी, वनकुसवडे, पळासरी, रामेल, काठी, अवसरी, काठी टेक, गावडेवाडी, खुडुपलेवाडी, धनगरवस्ती खु., मानीनगर, हुंबर्ली, पिराचीवाडी हु., देशमुखवाडी, गाडखोप, बाजेवर, नानेल, धनगर व नानेल, पाल्याचावाडा, गोकुळ, ऐनाचीवाडी, तोरणे, कुसवडे घाटमाथा, धनकळ, दाबाचामळा शिवदेश्‍वर, मेंढेघर, चाप्याचा खडक, गुनुकलेवाडी, विठ्ठलवाडी, झाकडे, गोवारे, पाथरपूंज, मळे, गोठणे, नाव, जंगलवाडी चाफळ, खबालवाडी, बोर्गेवाडी घोट, पातवडे, भारसाखळे, जवारातवाडी, बोर्गेवाडी, वाटोळे, कारवट, धनगरवाडी कारवट, घरातगड, टोळेवाडी, सडादाढोली, सडादुसाळे, चव्हाणवाडी, विरेवाडी, खोनोली, कोचरेवाडी, कोळेकरवाडी, बहिरेवाडी, पाडलोशी, तावरेवाडी, नेरळवाडी, गणेवाडी, बोड्रेवाडी, आसवलेवाडी, पाचगणी, बहे, धनगरवाडी, हुंबरणे, काहिर, आंबेघर तर्फ मरळी, वरांडेवाडी, गोकुळ तर्फ पाटण, नाटोशी, कळकेवाडी, धाजगाव, धडाबवाडी, भालेकरवाडी, दावरी, पळशी, सुर्पेवाडी, शितापवाडी, आटोली, नागवटेक आटोली, टेटमेवाडी,

उधवणे, नेहरूटेकडी, रूवळे, मेत्रेवाडी, जिंती, सतर, महालुगडेवाडी सतर, निगडे, मेंढ, घोटील धनगरवाडी, निनाईवाडी, कसणी, साठीचीवाडी कसणी, निवी, निवी बौध्दवस्ती, काढणे खु, काढणे बु., करपेवाडी काळगाव, धनगरवाडा, काजरवाडी, डुबलवाडी,
शिद्रुकवाडी, पागेवाडी, सजाटेवाडी, डाकेवाडी, चोरगेवाडी, खळे, वरकडवाडी, मस्करवाडी, सावंतवाडी, जांभुळबन, नानेल अशा 122 शाळांचा समावेश आहे. सातारा तालुक्यातील बेडवाडी, कुस बु. बोडारवाडी, मोरबाब, पिरेवाडी, पळसावडे, जगमीन, भैरवगड, जळकेवाडी, रेवडे, जांभळेघर अशा 10 शाळांचा समावेश आहे. वाई तालुक्यातील घेरा केंजळ, ओहळी, जांभळी, वडवली, मादगणी वासोळे, धनगरवस्ती जोर या 6 शाळांचा समावेश
आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news