कोल्हापुरातून उन्हाळी सुट्टीत जादा विमाने | पुढारी

कोल्हापुरातून उन्हाळी सुट्टीत जादा विमाने

पुणे/कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर, पुणे आणि शिर्डीतून उन्हाळी सुट्टीत जादा विमान उड्डाणे होणार असल्याचे रविवारी सांगण्यात आले. दरम्यान, तब्बल दोन वर्षांच्या खंडानंतर देशभरातून रविवारी विमानांची आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू झाली. पुणे विमानतळावर टॉप ट्रॅव्हल एजन्सीच्या वतीने दुबईला जाणार्‍या पहिल्या फ्लाईटच्या प्रवाशांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

पुण्यासह शिर्डी आणि कोल्हापूर विमानतळांवरून विमान उड्डाणांची संख्या वाढवली जाणार आहे. कोल्हापुरातून अन्य काही शहरांत तात्पुरती विमानसेवा सुरू होणार आहे. त्याचा तपशील मात्र उपलब्ध झालेला नाही. दरम्यान, रविवारी 40 देशांच्या एकूण 60 विदेशी विमान कंपन्यांनी विमानांची उड्डाणे सुरू केली. पुणे शहरातूनही रविवारपासून दुबई, शारजहाकडे विमानांनी उड्डाण घेतले. या सव प्रवाशांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

Back to top button