सातार्‍यात दोन दिवस पाणी पुरवठा विस्कळीत | पुढारी

सातार्‍यात दोन दिवस पाणी पुरवठा विस्कळीत

सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातारा शहराच्या प्रामुख्याने पश्‍चिम भागास कास धरण उद्भव योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. कास माध्यमातील बंदिस्त पाईपलाईनला पेट्री गावाजवळ मुख्य लाईनवर दोन ठिकाणी लागलेली पाणीगळती काढण्याचे काम नगरपालिकेने हाती घेतले आहे.

त्यामुळे दि. 3 रोजी कास माध्यमातील सायंकाळ सत्रातील पोळ वस्ती, संत कबीर सोसायटी तसेच डोंगराळ भागातील बालाजीनगर, कांबळे वस्ती, जांभळेवाडा या परिसरास तसेच कात्रेवाडा पाणी टाकीतून केला जाणारा सायंकाळ सत्रातील पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. दि. 4 रोजी सकाळ सत्रात पॉवर हाऊस येथून योदोगोपाळ पेठ, मंगळवार पेठेस होणारा पाणीपुरवठा होणार नाही. तसेच कात्रेवाडा पाणीटाकी, गुरुकुल पाणीटाकी, व्यंकटपुरा पाणीटाकी, भैरोबा पाणीटाकी, कोटेश्‍वर पाणीटाकी या टाक्यांच्या माध्यमातून वितरित होणारा
पाणीपुरवठा संबंधित भागास अपुर्‍या प्रमाणात किंवा अजिबातच न होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन मुख्याधिकारी अभिजीत बापट व पाणीपुरवठा अभियंता शहाजी वठारे यांनी केले आहे.

 

Back to top button