सांगली : धूमस्टाईलने महिलेचा दागिना लंपास

सांगली : धूमस्टाईलने महिलेचा दागिना लंपास
Published on
Updated on

सांगली : पुढारी वृत्तसेवा
येथील विश्रामबाग ते धामणी रस्त्यावर दुचाकीवरून निघालेल्या महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्यांचे गंठण दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने धूमस्टाईलने पळवले. सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी दिव्या दत्तात्रय पै (वय 45, रा. गुलमोहोर कॉलनी) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले, दिव्या पै आणि त्यांच्या जाऊ या दोघी दुचाकीवरून विश्रामबाग येथेे नातेवाईकांच्या लग्नासाठी गेल्या होत्या. लग्नसमारंभ संपल्यानंतर दोघी घरी निघाल्या होत्या. दिव्या दुचाकी चालवत होत्या आणि जाऊ ज्योती या पाठीमागे बसल्या होत्या.
खरे क्लब ते धामणी रस्त्यावर पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराने दिव्या यांच्या गळ्यातील तीन तोळ्यांचे गंठण तोडून घेतले. चोरटा हनुमाननगरच्या दिशेने पळून गेला. दिव्या यांनी त्याचा पाठलाग केला. परंतु तो पसार झाला होता. चोरट्याने पांढरा शर्ट घातला होता. तोंडाला पांढर्‍या रंगाचा टॉवेल बांधला होता. विश्रामबाग पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वाढत्या प्रकारांमुळे परिसरात घबराट
विश्रामबाग परिसात धूमस्टाईलने दिवसा दागिने पळवण्याचे प्रकार सतत होत आहे. गेल्या दोन दिवसांत विश्रामबाग परिसरातच असे दोन प्रकार झाले आहेत. त्यामुळे घबराटीचे वातावरण आहे. पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

हेही वाचलंत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news