सांगली : धार्मिक स्थळांना ध्वनीक्षेपक परवाना आवश्यक

सांगली : धार्मिक स्थळांना ध्वनीक्षेपक परवाना आवश्यक

सांगली : पुढारी वृत्तसेवा
सांगली, मिरजेसह जिल्ह्यातील सर्व समाजाच्या धार्मिक स्थळांवर ध्वनीक्षेपक लावण्यासाठी परवाना आवश्यक आहे. परवाने घेऊन व आवाजाची मर्यादा पाळून ध्वनीक्षेपक लावावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. मशिदीवरील ध्वनीक्षेपक उतरावेत, यासाठी 'मनसे' चे राज्यभरात आंदोलन सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलिसांनी सर्वच समाजाच्या धार्मिक स्थळावर ध्वनीक्षेपक लावण्यासाठी परवाना घेणे आवश्यक केले आहे.

जिल्ह्यात 508 मशिदी आहेत. यातील 495 मशिदीवर ध्वनीक्षेपक आहेत. केवळ 13 मशिदीवर ध्वनीक्षेपक बसविण्यात आलेले नाहीत. जिल्ह्यात 2596 मंदिरे आहेत. 263 मंदिरावर ध्वनीक्षेपक आहेत. जिल्ह्यात 204 मशिदींवर ध्वनीक्षेपक बसविण्यासाठी परवानगी अर्ज पोलिसांकडे आले आहेत. 27 मशिदींवर ध्वनीक्षेपक बसविण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मनसे व हिंदूत्ववादी संघटनेच्या 294 कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत.

पूर्वीचे गुन्हे दाखल असलेल्या 40 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून अनुचित प्रकार घडणार नाही, याबद्दल समज देण्यात आली. 207 मशिदीमध्ये ध्वनीक्षेपकाचा आवाज कमी करून नमाज पठण केले जात आहे.168 मशिदीध्ये ध्वनीक्षेपक न लावता नमाज पठण केले जात आहे. पोलिसांनी ध्नवीक्षेपकाची आवाजाची मर्यादा निश्‍चित करून दिली आहे. यामध्ये औद्योगिक, व्यापारी, निवासी व शांतता क्षेत्रांचा समावेश आहे.

हेही वाचलत का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news