सोलापूर : माहेराहून दहा लाख आणण्यासाठी विवाहितेचा छळ | पुढारी

सोलापूर : माहेराहून दहा लाख आणण्यासाठी विवाहितेचा छळ

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा :  पतीला स्वतंत्र फायनान्सचा व्यवसाय करण्यासाठी माहेरून 10 लाख रुपये आण म्हणून अमिषा पवार या विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी अमिषाचा पती नितीन अशोक पवार, सासू मिरा अशोक पवार, सासरा अशोक मोहन पवार सर्व (रा. सांजा चौक, हनुमान गल्ली,तिरूमला निवास, उस्मानाबाद) या तिघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणी अमिषा नितीन पवार (वय 21 रा. सध्या गैबीपीर नगर , रामवाडी) या विवाहितेने सलगर वस्ती पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यात म्हटले आहे की, अमिषा हिचे 29 नोव्हेंबर 2021 रोजी नितीन पवार याच्या बरोबर रितीरिवाजानुसार विवाह झाला होता. लग्न झाल्यावर 1 महिन्यांनी पतीसह सासू व सासरा या तिघांनी, नवविवाहिता अमिषा हिस तुझ्या आई-वडिलांनी लग्नात आमचा मानपान केला नाही. व आमचा अपमान केला. तसेच अमिषाचा पती नितीन याला स्वतंत्र फायनान्सचा व्यवसाय करण्यासाठी माहेरून 10 लाख रुपये घेवून ये म्हणून तिला शिवीगाळ करून मारहाण करणे, तिला उपाशी ठेवणे असा शारीरिक व मानसिक छळ केला.

या फिर्यादी वरून अमिषाच्या पतीसह तिघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. याचा पुढील तपास सलगरवस्ती पोलिस करीत आहेत.

Back to top button