बोरगाव : पुढारी वृत्तसेवा
गुरुवारी सायंकाळी अचानक वादळी वार्यासह झालेल्या उन्हाळी पावसानेे वाळवा तालुक्यातील नवेखेड परिसरातील पोल्ट्री शेड कोसळून 3 हजार कोंबड्या ठार होवून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
गुरुवारी सायंकाळी सोसाट्याच्या वार्यामुळे नवेखेड रस्त्यालगत असणार्या प्रकाश पाखले यांच्या 8 हजार पक्ष्यांच्या 200 फूट लांबीच्या शेडवरील पत्रे तुटून खाली कोसळले. त्याखाली सापडलेल्या 3 हजाराहून अधिक कोंबड्या मृत झाल्या. त्यांचे 35 ते 40 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यालगत असणार्या वैभव पाखले यांच्या 18 हजार पक्ष्यांच्या शेडमधील सर्वच यंत्रणा कोसळल्यामुळे 80 लाखाहून अधिक नुकसान झाले आहे. सदर नुकसानीचा पंचनामा तलाठी यांनी केला आहे.